थांब रे घना Thamb Re Ghana

थांब रे घना,


जा निरोप घेउनी, सांग मोहना





कुंज कुंज हा उदास


जागेपणि होत भास


तूच एक जाणिसी माझिया मना





एकटीच झुरत उभी


तारका न एक नभी


एकटीच सोसते सर्व यातना





सांग जाउनी तयास


वैरी माझेच श्वास


फूलही मला इथे होय वेदना

No comments:

Post a Comment