तळ्यात पाही पुनव चांदवा,Talyat Pahi Punav

तळ्यात पाही पुनव चांदवा होऊन गोरामोरा
आणि तरीही सतार घेऊन नील घन छेडी तारा

वेलीवरल्या मुक्या कळीला जाग हळू ही आज
जलवंतीच्या जळात भिजतो गंधवतीचा साज
दवबिंदूंचे उधळीत मोती भणंग होई वारा


निवांत निजली नगरी सारी जागत बसले दिवे
हिरव्या रानी रात्र खेळवी फूलपाखरी थवे
रात्र चांदणी चोर पाऊली उजळी घन अंधारा

अशाच वेळी कळी अवतरतो जडते अनाम बाधा
जडता अनाम बाधा होई लाट तळ्यातील राधा
भरास येता भरती बुडतो बेहोषीत किनारा

No comments:

Post a Comment