तळमळतो मी इथे तुझ्याविण,Talamalato Mi Ithe Tujhyavin

तळमळतो मी इथे तुझ्याविण
शून्य जाहले अवघे जीवन !

गीत उमलले माझ्या ओठी
गाइलेस तू ते मजसाठी
जुळता जुळता रेशीमगाठी
तुटले अवचित कोमल बंधन !

माळ ओघळे फूल ओविता
कवन भंगले शब्द गोविता
स्वप्न लोपले बघता बघता
असह्य आता हे जागेपण !

कळे मलाही तुझीवेदना
साद परी मी देउ शकेना
झाले गेले विसर साजणा !

No comments:

Post a Comment