श्रीरंग सावळा तू Shrirang Savala Tu

श्रीरंग सावळा तू मी गौरकाय राधा


ही प्रीत दोन जीवांची अद्वैत रे मुकुंदा



ये राधिके अशी ये होऊनि प्रीति मुग्धा


नयनातुनी फुलू दे अपुल्या अमोल छंदा



ये प्रेमले अशी ये फुलवित सुप्रभाती


प्रणायातल्या सुरांनी सजवित चांदराती


मिटल्या फुलापरी त्या तव नील लोचनांत


लावून भारलेली भावूक प्रीत ज्योत




का लोचनी प्रिया रे हृदयी तुझेच रूप


दिनरात लाविते मी येथे तुझाच दीप


गाते तुझेच गाणे स्वप्नी तुझे उखाणे


तुझियाकडेच धावे मनपाखरू दिवाणे




येताच मी परंतु तुझिया समीप का गे


होशी अबोल वेडी विणीशी मनात धागे


त्या चित्त पाखराला लपवून ठेविसी का


भारावुनी अशी या नेत्रात पाहसी का




तो बोलके अबोल क्षण सर्व आठवावे


मम लाजऱ्या दिठीत सारेच साठवावे


हा छंद या जीवाला जडवी तुझीच मूर्ती


मी मंगलातुनी या गुंफी अभंग नाती

No comments:

Post a Comment