फुले प्रीतिची आनंदाच्या अश्रूंनी भिजली
श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली
गुढ्या पताका तोरण साजे
रूपे घेती अवयव माझे
अभंग नौबत कंठामधुनी दाहि दिशा गाजली
हृदय म्हणू की हे सिंहासन
बसा रघुवरा घेते दर्शन
स्पर्श-सुखाने अवघी काया थरथरली, लाजली
पंचप्राण हे लावुन ज्योती
सर्वांगाने करिन आरती
भक्तिभाव ही टाळमंजिरी, तालावर वाजली
सर्वस्वाच्या नैवेद्याने
एकरूप हो दोन जीवने
तुझ्या कृपेची अमृतवेली, मनोमनी रुजली
No comments:
Post a Comment