श्रीमंत पतीची राणी, मग थाट काय तो पुसतां ।
बंगला नवा नवकोनी, फुलबाग बगीचा भवता ।
किती दासी जोडुनि पाणी,
"जी" म्हणतील कामाकरितां ।
ही जात्या चतुर शहाणी,
पति मुठींत ठेविल पुरता ।
सुग्रास बसुनि खायाला ।
मउ शय्या लोळायाला ।
गुजगोष्टि काळ जायाला ।
ना काम, धाम, ना चिंता ।
ही फुगेल बघतां बघतां ॥
No comments:
Post a Comment