श्रीरामा घनश्यामा बघशिल Shri Rama Ghan Shyama

श्रीरामा घनश्यामा बघशिल कधि तू रे ?


तुझी लवांकुश बाळे

वनवासाच्या घरात माझ्या अरुण-चंद्र हे सवे जन्मता


विरह प्रीतिचे दु:खही माझे हसले रघुनाथा


विश्वाची मी मंगल माता तुझी लाडकी सीता


तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले

रूप मनोहर तुझी पाहिली यौवनातली कांती


बाळांच्या या रूपे बघते तुझ्याच चिमण्या मूर्ती


पूर्ण पाहिले तुला राघवा परि ही दैवगति


तुझे बालपण तुझ्यापरी का वनवासी झाले

बघायचे जर नसेल मजला ये ना बाळांसाठी


चार करांचा कोमल विळखा पडु दे शामलकंठी


ताटातुटीच्या भेटी घडता झरझर अमृत ओठी


मिटुनी डोळे म्हणेन माझे रामायण संपले

No comments:

Post a Comment