क्षणभर, उघड नयन देवा
करावया तव मंगल पूजा
देहदीप मी जाळिन माझा
भावभक्तिचा हा नजराणा
स्वीकारुन घ्यावा
धूप जाळिते मी श्वासाचा
सुगंध पसरिल मंगलतेचा
कोमल पद हृदयावर ठेवित
प्रभू माझा यावा
अभंग नाही, नाही ओवी
मूक जिवाने कशि रे गावी ?
नयनांमधले अश्रू करिती
अखेरचा धावा
No comments:
Post a Comment