क्षणभर भेट आपुली Kshanbhar Bhet Aapuli

क्षणभर भेट आपुली झाली !

ओळख नव्हती मुळीच अपुली

नजर मात्र नजरेला भिडल

खुणा आंतरिक पटुनी काही हसू उमटले गाली !
गूढ भाव नेत्रात तरळले

रहस्य अपुले आपणां कळले

अनोळखीपण आड कशाला येइल मग त्या काली ?
दूर उभा तू जरि मजपासुनि

अंतर मधले गेले तुटुनी

स्पर्शसुखाची दुरून आपण अनुभविलीच नव्हाळी !
परिचय अपुला नसोच नसला

लौकिक परिचय हवा कुणाला-

युगायुगांची क्षणात जर का ओळख जिवास पटली ?

No comments:

Post a Comment