जुळत आली कथा, सिद्धीस जाईल का
जे हवे वाटते तेच होईल का?
मी न चुकले मुळी, बोलता वागता
हेतु होता मनी सारखा जागता
जाणुनी गूज तो जवळ घेईल का ?
चार डोळ्यांतल्या ओळखीच्या खुणा
उमगल्या ना तुला काय वेड्या मना
अर्थ मौनातला बोलीहुन बोलका
व्यर्थ शंका तुझी व्यर्थ ही भीरुता
मजसि भासे दिसे बहुदिशी चारुता
भाग्यसमयी अशा पुसशी का नेमका
No comments:
Post a Comment