जुळल्या सुरेल तारा,Julalya Surel Tara

जुळल्या सुरेल तारा स्मरते अजुन नाते
डोळ्यांत भाव माझे गाती तुझीच गीते

स्वप्नापरी अजून ते दिवस भासतात
छळती उनाड रात्री हळुवार गीत गात
तो काळ आठविता नयनांत नीर दाटे

फिरलो मिळून दोघे गुंफुन हात हाती
फुलले गुलाब गाली स्पर्शात धुंद प्रिती
त्या कोवळ्या वयाला वरदान दिव्य होते

शब्दात रंगविले मी भाव स्वप्न भोळे
उरली न प्रीत अपुली हो बागही निराळे
त्या भाबड्या कळीला गीतात अर्ध्य देते