जीवित माझे हवे तुला,Jeevit Majhe Have Tula

जीवित माझे हवे तुला तर घेऊन जा तू आता
सुवासिनीचे कुंकू हिरावुन नकोस नेऊ नाथा

संसाराची पूजा जाशी उधळून अर्ध्यावरती
मंगल मी रे, रचिले देऊळ तुझ्याच मूर्तिभवती
अश्रुफुलांचा अभिषेक करिते विरहिणीची प्रीति

ढळेल शांती पुजारिणीची कळस गोपुरी नसता

तुझ्यासवे तो हर्षही गेला, खेदही उरला नाही
पतिव्रतेला दर्शनाची खंतही आता नाही
कुंकुमतिलक भूषण भाळी इतुकेच नाथा देई
मिळेल मजला भाग्य सतीचे तूही जवळी नसता

No comments:

Post a Comment