जो तो सांगे ज्याला त्याला
वेड लागले राधेला
पितांबराची साडी ल्याली
मोरपिसांची करी काचोळी
वेळी अवेळी काजळकाळी
उटी लाविते मुखचंद्राला
विळखा सुंदर कचश्रेणीचा
मुकुट चढविते फुलेवेणीचा
हार अर्पिता मुक्तामणिचा
मोडीत डोळे प्रतिबिंबाला
डुंबत अविरत यमुना डोही
राधेची ती कृष्णा होई
मिठी मारते ओलेतीही
शेषशायी भगवंताला
No comments:
Post a Comment