जो जो गाई कर अंगाई,Jo Jo Gai Kar Angai

जो जो गाई ! कर अंगाई !
जोजविते तुजला आई

प्रेमभुकेल्या बाळासाठी
भाव दयेचा जागे पोटी

घास मुखीचा घाली ओठी
चोचीतला इवला कण देई
जो जो गाई ! कर अंगाई !

चिउकाऊच्या सांगे गोष्टी
फूलपऱ्यांची जागे सृष्टी
स्नेहसुधेची होता वृष्टी
मोहरते, फुलते, नवलाई
जो जो गाई ! कर अंगाई !

बालमनाची ओली माती
पुण्यात्मा हा घेई हाती
मूर्त नवी ये आकारा ती
ज्योत जळे, उजळे जळताही
जो जो गाई ! कर अंगाई !

No comments:

Post a Comment