जीवन गगन मी पाखरू
स्वच्छंद लागे संचरू
झेपावते आसावते
त्याला कसे आवरू ?
हाती तुझा दे हात गे
ओठांवरी दे ओठ गे
ये साजणी, नाही कुणी
आता नको बावरू !
दोघे प्रवासी प्रीतीचे
खोट्या जगाच्या नीतीचे
थोडे धुके, सारे फिके
ही शाल ये पांघरू
एकांत काली भेटलो
मी रोमरोमी पेटलो
बेधुंद मी, बेधुंद तू
साऱ्या जगा विस्मरू
No comments:
Post a Comment