जीव तुला लोभला,Jeev Tula Lobhala

जीव तुला लोभला माझ्यावरी रे शोभना
या ऋणाची विस्मृती ती ना कधी होवो मना !

का मुळी कोणी करावे प्रेम एखाद्यावरी ?
हे तुझे सौजन्य, पाणी आणिते या लोचना !

शक्तिच्या राज्यांत सक्ती शोभते, शोभो तिथे !
प्रीतिला स्वातंत्र्य आधी पाहिजे, का होय ना ?

आपुल्यामध्ये पडू दे शैलराजी सह्य ही
भेटती दूरांतरे सप्रेम कृष्णा-कोयना !

चाललो एका दिशेने थोडके का हे असे ?
सागरी एकाच भेटू अंतकाली मोहना !

No comments:

Post a Comment