जिवलगा कधि रे येशील तू,Jivalaga Kadhi Re Yeshil

दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू ?

धरेस भिजवुन गेल्या धारा
फुलून जाइचा सुके फुलवरा
नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू !

शारदशोभा आली, गेली

रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू !

हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !

पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभि पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !

1 comment:

  1. अतिशय सुंदर अनुभव हे गाणे ऐकणे म्हणजे. ते सर्वाना सहज उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप आभार 'मराठी गीतमाला'च्या चालकांचे.

    ReplyDelete