जे वेड मजला लागले,Je Ved Majala Lagale

जे वेड मजला लागले, तुजलाहि ते लागेल का ?
माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का ?

मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी
जे मी मुकेपणि बोलतो शब्दांत ते रंगेल का ?

हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण जाहलो
जे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का ?

माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज, गे
सर्वस्व मी तुज वाहिले, तुजला कधी उमगेल का ?



No comments:

Post a Comment