जेजुरीच्या खंडेराया जागराला,Jejurichya Khanderayaयळकोट यळकोट जय मल्हार
जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
वाईच्या तू गणराया जागराला या या
पसरणीच्या भैरी देवा जागराला या या
जेजुरगडा वाजे चौघडा वाजे चौघडा
पुणं धर्ती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं
रूप दावून बानू गेली, स्वारी देवाची येडी झाली
बानूबाईचं याड लागलं, मल्हारी देव मल्हारी
इसरून गेला कुण्या झाडाला भंडारी देव भंडारी
येळकोट येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती
नवलाख पायरी गडाला हो, चिरा जोडिला खडकाला
अवं बोला हो तुम्ही बोला, अवं म्हाळसा नारीला
भंडार वाहू देवाला हो मल्हारी रायाला
मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी
गळा घालितो भंडारी देव मल्हारी
मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड

No comments:

Post a Comment