जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फूल ठेवुनी गेले
रथ ऐश्वर्याचा या वाटेने गेला
जयघोष तुझा मग सर्व जगाने केला
मी दूर एकटी, माझे डोळे ओले
त्या फुलासारखी अबोल माझी प्रीत
ती अबोल पूजा या माझ्या हृदयात
नच ओठांवरती नाव तुझे कधि आले
तुज कसे कळावे देवा ? नाही कळले :
मी दूर अलक्षित तुजसाठी तळमळले
त्या फुलांत माझे हृदय ठेवुनी गेले
No comments:
Post a Comment