जनी नामयाची, रंगली कीर्तनी
तोच चक्रपाणी, धाव घेई
मुखी हरीनाम, नेत्र पैलतीरी
देवाची पंढरी, मोक्ष वाटे
दळीता कांडीता, वाहता कावडी
चिंतनात गोडी, विठ्ठलाच्या
चक्र टाकूनीया, दळावे हरीने
भक्तांचे देवाने, दास व्हावे
जुळे असे नाते, जळो गर्व-हेवा
तुझी आस देवा, पांडुरंगा
No comments:
Post a Comment