जाण आहे आपणासी, मी कशाला सांगणे
कठिण झाले प्राणनाथा, एकट्याने राहणे
दिवस जातो सहज सरुनी, रात्र बसते रोवुनी
पेटती हट्टास डोळे, नाव तुमचे घेउनी
चहू दिशांना एक दिसते रूप उमदे देखणे
नेटका संसार माझा नांदते मी गोकुळी
दु:ख आहे एक हे की राव नाही राउळी
फुलुन सुकती भाव मनीचे, ते कुणाला वाहणे
थेट तुमची सान मूर्ती, बाळ भवती खेळतो
पाहुनी त्या बाललीला, आसू गाली वाळतो
बिंब दिसता संपते का चातकाचे मागणे
No comments:
Post a Comment