जा सांग लक्ष्मणा,Ja Sang Laxamana

जा सांग लक्ष्मणा, सांग रामराजाला
"समजला" म्हणावे, "न्याय तुझा सीतेला

अग्नीत घेतली उडी उजळली कुडी
पटविले जेव्हा, होतास तिथे तू तेव्हा
केलास न्याय परि उलटा, ठरले कुलटा
केलीस सफळ मम सेवा

शोभले तुझ्या वंशास,
दिगंत यशास, चढेल तजेला"

जा सांग "जानकी अजुनी राहि जिवंत
जो रघुवंशाचा अंश तिच्या उदरात
तोवरी प्राण कोंडील देहकोषात
राणिची भिकारिण आज होय
रघुराज तिला सांभाळा"

No comments:

Post a Comment