जाई परतोनी बाळा,Jai Paratoni Bala

जाई परतोनी, बाळा, जाई परतोनी ।
निष्ठुर मी तुज टाकुन जाता, येशि कशाला माझ्या मागोनी ॥

जन्मतांच तव जननी गेली सोडुनि तुज या तपोवनीं ।
मींच पाळिलें लाड करोनी, काहिं न अडलें की तुझें ।
गेले जरी, काय उणे तुज, सांभाळितील बाबा तुजलागुनी ॥

No comments:

Post a Comment