जा रे चंद्रा, तुडवित मेघा
उधळित रथ अपुला
सांग सख्याला, बसले लावुन
डोळे वाटेला
रात चांदणी ही शरदाची
करिते माझ्या आग जिवाची
शपथ तुला रे तव रोहिणिची
घेउन ये त्याला
सांग सख्याला माझि कहाणी
दिवस गुजरते आसू पिउनी
कुशल तरी ये त्यांचे घेउनि
सांगाया मजला
इथे एकली पाहुन मजला
ह्सू नको रे उगिच खट्याळा
विसरलास का कलंक अपुला
गुरुशापे जडला
No comments:
Post a Comment