जा मुलि शकुंतले, सासरी
आवरी डोळ्यांमधल्या सरी !
वडील मंडळी असतिल कोणी
वागच त्यांच्या अर्ध्या वचनी
सवतीलागी मानुनी बहिणी
राहि सदा हासरी !
पतिसेवा हे ब्रीद आपुले
देवाहुन ती थोर पाउले
रागावून ते जरी बोलले
बोलु नको त्यावरी !
दोन्ही कुळांचे नाव वाढवी
पतिव्रतेची पदवी मिळवी
संसारी तुज वाण नसावी
लक्ष्मी तू साजिरी !
No comments:
Post a Comment