जा जा, रानीच्या पाखरा, तू जा, रं, भरारा
तुला घालिते चारा, तुला घालिते चारा
द्यावा संदेसा म्हायेरा, जा रं, भरारा !
दूर डोंगरापल्याड नदीकाठी माझा गाव
तिथं नांदतोया द्येव नरसुबाराव
लहान-थोरांसी मायेचा त्योच आसरा !
बाई, म्हयेराचं थोरपन वानु कसं ?
पुन्यवंत माझं मायबाप द्येव जसं
गंगा निर्मळ मायेचा व्हातोया झरा !
माझ्या खुशालीचा सांगावा दे माउलीला
पड पाया तिच्या, सांग, येती याद मला
तुला भेटाया जीव हुतो माझा घाबरा !
No comments:
Post a Comment