जा जा जा रे नको बोलु जा ना !
जा जा मीही भिते काय कोणा ?
आधी स्वत: केला गुन्हा
जोर तुझा का रे पुन्हा सांग ना ?
माझे मन वारा
भवती फिरणारा
झुरतो झुरणारा क्षणा क्षणा
स्वैर मी वाहते मुक्त मी चेतना !
मी रे फुललेली
वासंतिक वेली
सुमने भुलवावे कुणा कुणा
गंध का कोणत्या मानितो बंधना ?
No comments:
Post a Comment