हृदयात दाटलेले हृदयात Hridayat Datalele Hridayat

मी बोलले न काही नुसतेच पाहिले


हृदयात दाटलेले हृदयात राहिले


परतून हाय जाण्या ओठांत शब्द आले


डोळ्यांतले इषारे डोळ्यांत कैद झाले


मी बंद पापण्यांनी हे सर्व साहिले


देऊन सर्व काही नाही दिलेच काही


ज्याला हवे कळाया कळलेहि त्यास नाही


माझ्याच अंतरी मी हे फूल वाहिलेनिःशब्द आसवांनी समजाविले मनाला


की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला


माझ्याच मी मनाशी हे गीत गायिले