हृदय हासले मी गुणगुणले Hriday Hasale Mi
हृदय हासले मी गुणगुणले
जागेपणी मी स्वप्न पाहिले
सांजसमयी एका प्रहरी
तू आलास मज सामोरी
वृत्ती हासरी दृष्टी बावरी
पाहुनी मन भुलले, लाजले
भेट आपुली क्षणभराची
वाटे मजसी युगायुगांची
ओढ लागते तव प्रीतिची
तुझ्यासवे रमले, रंगले
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment