हृदयि प्रीत जागते Hridayi Preet Jagate

राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा


हृदयि प्रीत जागते जाणता अजाणतापाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते


लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते


ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता

दिवसरात्र ओढणी या मनास लागते


तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते


मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता


निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी


नादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी


वेड वाढवून तो उडून जाय मागुता

No comments:

Post a Comment