घरोघरी वाढदिन,Gharoghari Vadhadin

घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला
बारा मास, सहा ऋतु अर्पिती वर्षमाला

देह चंदनाची काठी झिजे ज्यांची लेकीसाठी
सेवा साफल्याची उटी, लावलीत पितृत्वाला

डोळियांच्या ओंजळीत तुडुंबलेली पाणगंगा
प्रेमाच्या तू पांडुरंगा चला उठा आंघोळीला

सोडा आता उपवास, लेक झाली मिळवती
घ्या हो घास माझे हाती वर्षाच्या या दिवाळीला

No comments:

Post a Comment