घरात हसरे तारे असता
मी पाहु कशाला नभाकडे
छकुल्यांची ग प्रशांत वदने
गोड गुलाबी गाली हसणे
अमृत त्यांच्या ओठी असता
कशास मधुघट हवा गडे
गोजिरवाणी जशी वासरे
प्रेमळ माझी गुणी लेकरे
स्वर्ग अवतरे घरात माझ्या
आनंदाचे पडति सडे
गोकुळ येथे गोविंदाचे
झरे वाहती शांतिसुखाचे
वैभव पाहुन मम सदनीचे
ढगाआड ग चंद्र दडे
No comments:
Post a Comment