डोळ्यांमधले आसू पुसती Dolyamadhale Aasu Pusati

कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे

डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे



बहर धुंद वेलीवर यावा

हळुच लाजरा पक्षी गावा

आणि अचानक गळुन पडावी विखरुन सगळी पाने




भान विसरुनी मिठी जुळावी

पहाट कधि झाली न कळावी

भिन्न दिशांना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे



हळुच फुलाच्या बिलगुनि गाली

नाजुक गाणी कुणी गायिली

आता उरली आर्त विराणी सूरच केविलवाणे



जुळली हृदये, सूरहि जुळले

तुझे नि माझे गीत तरळले


व्याकुळ डोळे कातरवेळ स्मरुन आता जाणे

No comments:

Post a Comment