डोळ्यांवरून माझ्या उतरून Dolyavarun Majhya Utarun

डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली

वचने मला दिलेली विसरून रात्र गेली !डोळ्यांत जन्म सारा, दाटून डोह झाला

अश्रूंत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली !मी मानिले मनाशी, माझेच सर्व तारे


स्वप्नात हाय माझ्या विसरून रात्र गेली !आश्वासने किती ती, पाऊस तो फुलांचा

काळोख फक्त हाती ठेवून रात्र गेली !