ज्ञानियांचा राजा Dnyaniyancha Raja

ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ।

म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥




मज पामरासी काय थोरपण ।

पायींची वहाण पायीं बरी ॥२॥




ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळगणे ।

इतर तुळणें काय पुढे ॥३॥




तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोलीं ।

म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥

No comments:

Post a Comment