ज्ञानदेव बाळ माझा Dnyandev Bal Majha

ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता, भगवंता

लक्ष द्या हो विनवीते मराठी मी त्याची माता
गोड माझ्या सोनुल्याचा, लळा लागे बाळपणा !

बांधुनीया घुंगुरवाळे, अंगी नाचे थोरपणा !

निरूपण सांगायाला, तुम्ही द्या हो शहाणपणा

बाळमुखी मोठा घास, भरवा हो जगन्नाथा
निरक्षर लोकांसाठी, प्राणांचेही देऊन मोल

अमृताते जिंकित पैजा धावे मराठीचा बोल

ज्ञानदीप डोळियांचे तेजाळता तेजोगोल

देवगुरु खाली आले जोडोनिया दोन्ही हाता

No comments:

Post a Comment