डाव मांडून भांडून Daav Mandun Bhandun

डाव मांडून भांडून मोडू नको

डाव मोडू नकोआणले तू तुझे सर्व, मी आणले,

सर्व काही मनासारखे मांडले,

तूच सारे तुझे दूर ओढू नको
सोडले मी तुझ्याभोवती सर्व गे,

चंद्र ज्योतीरसाचे रुपेरी फुगे

फुंकरीने फुगा, हाय, फोडू नको'गोकुळीचा सखा' तूच केले मला,

कौतुकाने मला हार तू घातला,

हार हासून घालून तोडू नकोकाढले मी तुझे नाव, तू देखिले,

आणि माझे पुढे नाव तू रेखिले,


तूच वाचून, लाजून, खोडू नको

No comments:

Post a Comment