डोकं फिरलंया बयेचं डोकं फिरलंया
हाताला धरलंया म्हणते लगीन ठरलंया
हिला भरलंया न्यारं पिसं, ही पाही ना रातं-दिसं
साडी सोडून इजार नेसं, हिंडे घेऊन मोकळे केस
वारं भरलंया अंगात वारं भरलंया
हाताला धरलंया म्हणते लगीन ठरलंया
मन नाही हिचं स्थिर, हिला राहीला ना धीर
नजरेचा मारते तीर, हिची नजर ती भिरभिर
भूतानं घेरलंया हिला भूतानं घेरलंया
हाताला धरलंया म्हणते लगीन ठरलंया
काय सांगावी परवड, झोपेत ही बडबड
झाली घरात ही धडपड, बया झालीया वरचढ
कोंबडं आरलंया ज्वानीचं कोंबडं आरलंया
हाताला धरलंया म्हणते लगीन ठरलंया
नवानवाच नखरा दावी मग बळंच म्हस्का लावी
सारं करून देते नावी सांगे संदीप तो अनुभवी
पाणी मुरलंया कुठंतरी पाणी मुरलंया
हाताला धरलंया म्हणते लगीन ठरलंया
No comments:
Post a Comment