चित्र तुझे हे सजीव होऊन येईल भेटीला
लागले पंख प्रीतिला
असेच भोळे असतील डोळे
केस कपाळी कुरळे कुरळे
रंग गुलाबी असेल का रे हसऱ्या ओठीला
लागले पंख प्रीतिला
रूप दर्पणी भिन्न दिसावे
हृदय मंदिरी तूच असावे
उपमा नाही तुझ्या नि माझ्या प्रेम संगतीला
लागले पंख प्रीतिला
या प्रतिमेची करीन पूजा
ह्या हृदयाचा तू तर राजा
तुझिया चरणी अर्पण करिते माझ्या भक्तीला
लागले पंख प्रीतिला
No comments:
Post a Comment