चिन्मया सकल हृदया, सदया दे या गोविंदा
वर वरदा, कलिमलविलया ॥
विषय पिपासापीडितसा, नि:सारा, संसारा
मृगनीरासम भुललों मी परि फसलों
विस्मरलों तव भजनीं लागाया ॥
कामधनाशा ही विवशा, मन्नाशा
सरसावे, तत्पाशीं सांपडलों, यें धांवोनी
यांतुनी सोडवुनी मज घ्याया ॥
सौख्य सदा नव ज्या ठायीं, तापाचा,
पापाचा लेश नसे, शांति वसे, ने येवोनी
त्या स्थानी, सुखभुवनीं दासा या ॥
apratim
ReplyDeletelegendary
ReplyDelete