चित्र जयाचे मनी रेखिले
शिवशंकर ते आज पाहिले
ध्यानमयी ते रूप मनोहर
वदनावर हे तेज शुभंकर
स्वप्न माझे सगुण रुपाने जणू मूर्त जाहले
समीप येता अधिर पाउली
अमृतात ही काया न्हाली
तनूमनाचे भान प्रियाच्या चरणांवर वाहिले
आता दुजेपण कोठे राहिले ?
अवघे जीवन शिवमय झाले
या देहाचे बंध तोडुनी अनंतास पर्णिले
No comments:
Post a Comment