चिन्या,Chinya

बम चिक बम चिक बमबमबम
चिन्या आपला सुपरहिट एकदम
कट्टी बट्टी शाळेला सुट्टी
चिन्याची दुनिया भारी
तो त्याचा मर्जीचा राजा
खिशातही स्वप्ने सारी
सूर्याला शिकवे सूर्यनमस्कार
आई किती किती करशील संस्कार
अभ्यासाशी ढिशँव ढिशँव
आजोबांकडे खातो भाव
कोणाशी कितीही पंगा
तरी बाबांशी यारी है ना -
चिन्या चिन्या रे चिन्या चिन्या
नवीन गोंधळ खोड्या जुन्या
चिन्या चिन्या रे चिन्या चिन्या
चिन्या चल करू थोडा दंगा
घरात तो अन् त्याच्यात घर
दोघांचा धिंगाणा चाले
मस्तीत तो अन् त्याच्या तालावर
घराचे छप्पर डोले
चिन्या चिन्या रे चिन्या चिन्या
नवीन गोंधळ खोड्या जुन्या
चिन्या चिन्या रे चिन्या चिन्या
चिन्या किती करशील दंगा-

No comments:

Post a Comment