घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा
चिकना चिकना म्हावरा माझा
इस्वास ठेव रं सांगतंय् नक्की
याचे पुरती कोंबरी फिकी
अंगानं जोर येईल कामकाजा दादा कामकाजा
चिकना चिकना म्हावरा माझा
दिसतंस मेल्या बोंबलावनी
खाशील तर होशील भोपल्यावानी
ताकदीच्या दव्याचा ह्यो राजा दादा ह्यो राजा
चिकना चिकना म्हावरा माझा
तलूनशी खा जरा गरम गरम
मिटुनशी जाईल सगला भरम
वाजंल खुषीचा बेंडबाजा दादा बेंडबाजा
चिकना चिकना म्हावरा माझा
No comments:
Post a Comment