चंद्रा रे मी तुझी रोहिणी,Chandra Re Mi Tujhi Rohini

चंद्रा रे मी तुझी रोहिणी
पाहते तुला मोहुनी, लाजुनी

दो जीवांचे अमृत मीलन
रिमझिम बरसत नील नभातुन
मोहरलेली स्पर्ष फुलातून
अंतरीची रातराणी

चंद्रबींब तव समीप आले
चकोर नयनी नाचू लागले
भाव मनाचे हसले लपुनी
फुलत्या कमळातुनी

तुझे नी माझे बांधुन डोळे
लपंडाव ही प्रीत खेळे
अधरावरले गीत गोड ते
जाई रात्र चांदणी

No comments:

Post a Comment