चाल राजा, चाल सर्जा, वेग थोडा वाढवा
सोनपंखी ऊन उतरे चाखण्यासी गारवा
ऊसमासाच्या सकाळी जोम अंगी दाटतो
नाद तुमच्या घुंगुरांचा मधुर भारी वाटतो
दूर सरतो रे धुक्याचा सरक पडदा आडवा
पिकत आला पार शाळू, पाचू पडला पांढरा
फूलतुऱ्याचा ऊस डोले टंच हिरवा हरभरा
दरवळे रानी सुबत्ता भारले वारे, हवा !
शर्यतीची शान आता पायी तुमच्या येऊ द्या
पालखीवाणी परी ही बैलगाडी जाऊ द्या
आत बसल्या रानगौरी जाण याची वागवा
No comments:
Post a Comment