उठ झाला प्रातःकाल, तुझे गोपाल आले, वननिळा
पूर्व दिशे उदेला भानू, आला उदयाचळा
प्राणीमात्र पशू पक्षी, विश्रांत वृक्षी, अपुल्या स्थळी
निद्रा सारून जागृत होती पंच उषःकाळी
रावे मयुरे, संश साया, सुस्वर मुख कमळी
सद्भावे तुज ख्याती गाती स्वमुखे नामावळी
कनकाचे घट शिरी, यमुना तिरी, जाती जळा
पूर्व दिशे उदेला भानू, आला उदयाचळा
No comments:
Post a Comment