उजाडल्यावरी सख्या निघून,Ujadlyavari Sakhya Nighun

उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजून ही उशीवरी टिपूर चांदणे

उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू ?
पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू ?
पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे

अजून कुंतलात या तुझा न जीव कुंतला
अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे

अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी
तुला मला विचारुनी फुटेल आज तांबडे

No comments:

Post a Comment