उद्धवा अजब तुझे सरकार,Uddhava Ajab Tujhe Sarkar

उद्धवा, अजब तुझे सरकार !
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार !

इथे फुलांना मरण जन्मता,दगडाला पण चिरंजीविता
बोरी-बाभळी उगाच जगती, चंदनमाथि कुठार !

लबाड जोडिति इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार !

वाइट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले

या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार !No comments:

Post a Comment