ओळखिले मी तुला नाथा, ओळखिले मी तुला
कुरूप सावळ्या मूर्तीमधला देवपणा जाणिला
सौधावरती पडे चांदणे
अर्ध्या मिटल्या माझ्या नयने,
टिपले कण ते अधिरपणाने
सतार अंकी घेउनीया तू अनुरागची छेडिला !
कला करी तव, उदारता मनि
भीती रमली अंती पूजनी
तव सहवासी मधु दिनरजनी
काल सुगंधित, देह सुगंधित, सुगंध उरी दाटला !
तुझ्यासारखा नाथ असावा
तुझ्या छातीवर घेत विसावा
उरला-सुरला राग हसावा
ठसा मूर्तिचा तुझ्या सानसा पोटी मी गोपिला !
No comments:
Post a Comment